पाचोरा (प्रतिनिधी) – माजी आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा – भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता बैठक येथील महालपुरे मंगल कार्यालयात संपन्न झाली.
या बैठकीत माजी आमदार दिलीप वाघ यांनी कार्यकर्त्यांना पुढे येणाऱ्या ग्रामपंचायत तसेच नगरपालिका निवडणुकीसाठी तयारीला लागावे असे सांगत सामान्य जनतेला कोरोना काळात अधिकाधिक मदत पोचविण्याचे आवाहन देखील केले. बैठकीच्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, शिवाजीराव वाघ, लताताई देशमुख यांचेसह विविध क्षेत्रातील ज्ञात-अज्ञात दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे यांनी केले तर खलील देशमुख अजहर खान यांनी मनोगत व्यक्त केले.
विकास पाटील यांनी कोरोना काळात जिल्ह्यात सर्वप्रथम फेसबुक सारख्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यापासून तर प्रत्यक्ष मास्क वाटप आणि किराणा वाटप देखील राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी गटनेते संजय वाघ विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे खलील देशमुख,तालुका अध्यक्ष विजय पाटील,शहराध्यक्ष सतीश चौधरी,नगरसेवक वासुदेव महाजन,सुरेश देवरे,विकास पाटील,अशोक मोरे, भडगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव माजी नगराध्यक्ष श्यामकांत भोसले कार्याध्यक्ष हर्षल पाटील, भूषण वाघ,सिताराम पाटील,प्रा.भागवत महालपुरे,दिगंबर दादा पाटील,सुनील विठ्ठल पाटील, प्रकाश नाना निकुंभ, डॉ. पी. एन. पाटील, ललितदादा वाघ, सुभाष पाटील,बशीरदादा बागवान,शिवाजी दादा पाटील, स्नेहल गायकवाड, बाबाजी पाटील, स्वप्नील पाटील,स्वदेश पाटील, संदीप पाटील, अरुण सोनवणे, गजानन पवार, किरण देवरे, अरुण पाटील,प्रकाश पाटील,प्रकाश भोसले,सागर भोसले,भूषण पाटील,सचिन पाटील, हारूण दादा,जनार्धन पाटील,सुभाष पाटील,सतीश देशमुख, सागर पाटील, संजय सूर्यवंशी, योगेश पाटील,रणजित पाटील, सुनील पाटील,योगेश कुमावत,शुभम नाईक,गोपी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.