जिल्हाधिकाऱ्यांची केसरीराजला माहिती

जळगाव(प्रतिनिधी)- शहरात ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार लवकरच एक भरारी पथक नेमून याबाबत खात्री करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी केसरीराजशी बोलतांना दिली.
जिल्ह्यात कोरोना साथरोग दिवसेंदिवस वाढत चालला असून तो कमी करण्यासाठी देखील प्रशासनातर्फे जिकरीचे प्रयत्न सुरु आहे. जिल्ह्यातील कोविड दक्षता केंद्र आणि कोविड रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा होऊ नये यासाठी राज्यशासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्याप्रशासनाने देखील समिती नेमलेली आहे. हि समिती दररोज ऑक्सिजन सिलेंडर पुरवठ्याबाबत आढावा घेत असते. मात्र शहरात काही भागांमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा साठा लपवून ठेवला जात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे वाढत्या तक्रारी पाहता त्याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार याबाबतची माहिती तपासत आहेत. संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.







