शहरातील निमखेडी शिवारातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील निमखेडी रोडवर शिवशक्ती कॉलनीत एका किराणा दुकानदार असणाऱ्या महिलेच्या गळ्यातून ९८ हजार रुपयांची मंगलपोत अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रंजना पंढरीनाथ पाटील (वय ५६, रा. शिवशक्ती कॉलनी, निमखेडी रोड, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे शिवशक्ती कॉलनीत किराणा दुकान आहे. २२ जून रोजी रात्री ९ वाजता ते दुकान बंद करीत असताना तेथे अज्ञात दुचाकीस्वार आले. त्यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची ९८ हजार रुपयांची मंगलपोत बळजबरीने तोडून पळून गेले.
रंजना पाटील यांनी तातडीने तालुका पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यानुसार २३ जून रोजी रात्री १२. ३० वाजता गुन्हा दाखल झाला असून तपास पोउनि नयन पाटील करीत आहेत.