अमळनेर तालुक्यातील सुभाष चौकातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- पोलिसांना माहिती देतो या संशयावरून दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ याने एकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना दि. ३१ रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास सुभाष चौकात घडली.याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल रमेश भोई (वय २९, रा. शिवशक्ती चौक, अमळनेर) हा त्याच्या मित्रांसोबत दि. ३१ रोजी सुभाष चौकात उभा होता. तेव्हा संशयित आरोपी दादू उर्फ राजेश एकनाथ निकुंभ याने राहुलला हटकले की, तू पोलिसांना माहिती देतो. त्यानंतर दादू धोबी याने हातातील चाकूने राहुलच्या मानेवर वार केला. खांद्यावर तो वार झेलल्याने जखमी झाला. त्याच्या मित्रांनी भांडण आवरल्यानंतर दादूने धमकी दिली की ‛आज तो बच गया, अगली बार छोडुंगा नही ‘’ म्हणत निघून गेला. मित्रांनी राहुलला दवाखाण्यात नेले. त्यांनतर अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून तप्पास सहाय्य्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावित करीत आहेत.