अडावद पोलीस स्टेशनला होते कार्यरत
पोलिस तपास सुरू असतांना, १४ डिसेंबर रोजी चोपडा शहर पोलिसात मिसिंग गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहाच्या कपड्यांवरून व चप्पलावरून पोलिस कॉन्स्टेबल संजय पाटील यांचा मृतदेह असल्याचे त्यांच्या पत्नीने ओळखले. यावरून नातेवाईकांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतदेहाची खात्री केली, आणि पत्नीने ही मृतदेह त्यांचाच असल्याचे स्पष्ट केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचे तपास पोलीस हवालदार गणेश पाटील करीत आहेत.