जळगाव (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील महिला दक्षता समिती कार्यालयातील एएसआय मिलिंद केदार यांना 20 हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी पकडल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला. एका वादात तडजोड करण्यासाठी केदार यांनी 25 हजारांची लाच मागितली होती तर 20 हजारात तडजोड झाल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा यशस्वी करण्यात आला.