जळगाव (प्रतिनिधी) : जळगांव उपविभागातर्फे “तक्रार निवारण दिन (जनता दरबार)” चे आयोजन दि. ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय ग्राउंड जवळ, जळगांव येथे करण्यात आले आहे. सदर “तक्रार निवारण दिन (जनता दरबार)” दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत तसेच जळगांव उपविभागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व अंमलदार हे उपस्थित राहणार आहे.
तरी जळगांव उपविभागातील (जळगांव शहर, शनीपेठ, जिल्हापेठ, एमआयडीसी, जळगांव तालुका, रामानंदनगर) पोलीस स्टेशन हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील राहणारे नागरिकांना कळविण्यात येते की, त्यांनी आपल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तसेच तक्रारींचे अडीअडचणी असल्यास दिनांक ०६ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय ग्राउंडजवळ जळगांव येथे हजर राहावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.