पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांचेसह सहाय्यक फौजदार महाजन यांचे निलंबन झाले आहे. आता बकाले यांच्या जागी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्याकडे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पदभार सोपवला आहे. याबाबतची माहिती त्यांनी संध्याकाळी आदेशाद्वारे जारी केली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आदेशात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक किसन लक्ष्मण नजन पाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचे नियमित नेमणुक आदेश होईपावेतो त्यांचा मुळ नेमणुक पाचोरा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी या पदाचे कामकाज सांभाळून पाहतील.
किसन नजन पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये यशस्वी पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धत पाहता एलसीबी या महत्त्वाच्या विभागात त्यांची नेमणूक पोलीस अधीक्षकांनी केली आहे. किरण कुमार बकाले यांच्याप्रमाणे आताही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी किसन नजन पाटील यांच्या कार्यकाळात कायम चांगली राहील अशी आशा व्यक्त होत आहे.