बोदवड (प्रतिनिधी ) तालुक्यातील लोणवाडी येथील शेतकर्याचा बैल धुण्यासाठी तलावात गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. शुक्रवार २६ रोजी पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटने मुले गावात शोककळा पसरली आहे.
विनोद वसंत चौधरी (४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. विनोद चौधरी हे पोळा सणानिमित्त शेतकरी विनोद चौधरी हे शुक्रवारी पिंपळगाव देवी रस्त्यानजीक असलेल्या बोरलोन या ठिकाणी बैलजोडी धुण्यासाठी गेले असता अचानक पाण्यात बैल बिथरला व त्याचवेळी शेतकर्याचा हातातील दोर न सुटल्याने ते गाळात रुतले व नंतर पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला . त्यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकर्याच्या मृत्यूने लोणवाडी गावावर ऐन पोळ्याच्या दिवशी शोककळा पसरली. मयत विनोद वसंत चौधरी यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.








