जळगाव (प्रतिनिधी ) – पोदार एज्युकेशन नेटवर्क ही भारतभर दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जाणारी अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. नऊ दशकांहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात सेवा देत, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांमध्ये भारतातील अव्वल क्रमांकाची संस्था असल्याचे सिद्ध झाले आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्र,स्पर्धा परीक्षामधील सक्रीय सहभाग,संस्कृती संवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सामाजिक दृष्टीकोन अधिक व्यापक करण्याचाही प्रयत्न पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव करीत असते.
विद्यार्जनास पोषक अश्या वातावरणा सोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षितता व आरोग्य या विषयवार देखील भर दिला जातो. सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे दि. ४ व ६ ऑक्टोबर २०२२ रोजी विद्यार्थ्यांसाठी इंडियन डेंटल एसोसीएशन ,जळगाव तर्फे मोफत दंत व मुख रोग चिकित्सा शिबीरचे आयोजन करण्यात आले. यात पोदार स्कूलच्या ई.१ ली ते ई.१० वी पर्यंतच्या १२०० हून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी शहरातील नामवंत मुख व दंतरोग तज्ञांकडून करण्यात आली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये इंडिअन डेंटल एसोसीएशन,जळगाव च्या अध्यक्षा मा.डॉ.पूनम पाटील यांच्या समवेत संस्थेच्या सचिव डॉ.सौ.नीलम किनगे,सी डी ई कन्वेनर डॉ.सौ.सोनाल पाटील,डॉ.सौ.भाग्यश्री बडगुजर ,डॉ.सौ.वर्षा रंगलानी ,डॉ.सौ.सारंगा लोखंडे ,डॉ.सौ.वर्षा चौधरी ,डॉ.सौ.मेघना तोतला, डॉ.श्री दिलीप गाढे,डॉ.मनोज लोखंडे ,डॉ. नितीन गुरव,डॉ श्री निलेश अमोदकर,डॉ.श्री राहुल पाटील याअनुभवी व तज्ञ नामांकित डॉक्टरांचे अमूल्य योगदान होते.
पोदार स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी इंडिअन डेंटल एसोसीएशन,जळगाव च्या अध्यक्षाडॉ.पूनम पाटील तसेच सर्व उपस्थित पदाधिकारी डॉक्टर्स चे पुष्पगुच्ह व सन्मानचिन्ह देवून स्वागत केले. पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मोफत दंत व मुख चिकित्सा शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व मान्यवर डॉक्टर्सचे त्यांच्या अमूल्य सेवेसाठी संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोदार स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.