जळगाव (प्रतिनिधी ) – ५ सप्टेंबर, भारतरत्न तसेच माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून सन
१९६२ पासून साजरा करण्यात येतो. एका राष्ट्रपतींचा वाढदिवस तो मूलत: शिक्षक असल्यामुळे ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो, या भारतातील फारच सुसंस्कृत व दर्जेदार घटनेचे जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिपाठाच्या वेळी आयोजित कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला. शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी शिक्षक पालक संघाच्या प्रतिनिधींचे स्वागत केले.शाळेचे उपप्राचार्य दिपक भावसार यांनी पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी,सन्माननीय पालक,विद्यार्थी तसेच उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते’ भारतरत्न ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्याक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कु. योषा गांधी (हेडगर्ल)व जैत्र राणे (हेडबॉय) या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.यावेळी ई.७ वी च्या विद्यार्थिनीनी स्वागत
नृत्य सादर केले. प्रांजली पाटील या विद्यार्थिनीने आपल्या भाषणात थोर शिक्षक,तत्वज्ञानी, लेखक, ‘भारत रत्न ‘ डॉ.सर्वपल्ली
राधाकृष्णन यांचा जीवनपट श्रोत्यांसमोर उलगडला. ई.९ वी च्या विद्यार्थ्यांनी यावेळी लघुनाटिका सादर केली.शिक्षणाच्या प्रवाहात सर्वाना सामावून घेण्यात यावे. दुबळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून नवीन ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रेरित केले जावे हा आशय होता. या दरम्यान आदरणीय शिक्षक्वृन्दांसाठी निरनिराळे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले गेले.शेरोशायरी ,ट्रेजर हंट इ.सारख्या खेळांमधून शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थी जीवनाची आठवण झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या समूहाने सामुहिक नृत्य सादर करून आपल्या गुरुजनांचा आदर केला.कु.अदिती वाघ हिने दृक-श्राव्य साधनाच्या माध्यमातून गुरुजनांचे आभार मानून शिक्षकांच्या अमूल्य मार्गदर्शनासाठी आपली कृतज्ञता व्यक्त केली. शाळेचे नियमित कामकाज विद्यार्थी शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.यातून विद्यार्थ्यांना वर्गात प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेता आला. शाळेचे प्राचार्य श्री. गोकुळ महाजन यांनी उपस्थित शिक्षकवृन्दाचा सत्कार केला.आपल्या भाषणातून गुरुजनांविषयी आदर व्यक्त करीत त्यांचे आभार मानले.जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. कोणतीही व्यक्ती ही कायम विद्यार्थीच असते, असे म्हणतात. प्राथमिक गोष्टी आई शिकवते. समाजात वावरण्यापासून ते मनगट बळकट करण्यापर्यंतचे शिक्षण शिक्षक देत असतात असे विचार मांडले.मातृपितृ ऋण,गुरु ऋण आणि समाज ऋण फेडण्यासाठी विद्यार्थ्याने कटिबद्ध असले पाहिजे असे मत त्यांनी मांडले. शाळेचे उप-प्राचार्य दिपक भावसार ,पोदार जम्बो किड्स च्या मुख्याध्यापिका सौ. उमा वाघ ,प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे वरिष्ठ समन्वयक हिरालाल गोराणे ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आभारप्रदर्शन कु.अवनी पंजाबी व कु.आरव शहा यांनी केले.