लासुर ता चोपडा (वार्ताहर) – कोरोना रोगापासून बरे झालेल्या रूग्णांचा मित्र परिवार,ग्रामस्थ,आरोग्य प्रशासन यांचा हस्ते सत्कार ही बाब कोरोना रोगाने थैमान घातल्यापासुन ऐकत आहोत पण या प्रथेला दुजोरा देत ए एम न्युजचे चोपडा तालुका प्रतिनीधी आत्माराम पाटील यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर आरोग्य प्रशासनाचे ॠण फेडण्याचा हेतुने शाल,गुलाबपुष्प देऊन सत्कार करत समाजासमोर अनोखा आदर्श ठेवला.
पत्रकार आत्माराम पाटील यांना 2 सप्टेंबर रोजी कोरोना रोगाची लागण झाल्यानंतर त्यांना गृहविलगीकरण करण्यात आले या कालावधीत वैद्यकिय अधिकारी डाॅ.दिनेश निळे,डाॅ.अमित देसले तसेच कर्मचारी यांनी वेळोवेळी आरोग्याची विचारपुस करत मार्गदर्शन केले म्हणुन सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा सत्कार करत एक नवीन आदर्श निर्माण केला.
लासुर प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डाॅ.दिनेश निळे,डाॅ.अमित देसले तसेच त्यांच्या सहकार्यांचा सत्कार उपसरपंच अनिल वाघ,आत्माराम पाटील,उपेंद्र पाटील,भगवान न्हायदे,मच्छिंद्र कोळी,परेश पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आला.