जळगाव( प्रतिनिधी ) – शहरातील नवीपेठेत गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या संशयीत आरोपीला बुधवार 5 ऑक्टोबर रोजी दुपारी शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती अशी की, जळगाव शहरातील नवीपेठ भागात सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर संशयित आरोपी निखिल सुरेश पाटील (वय – 35) रा.खोटे नगर, जळगाव हा कमरेला गावठी पिस्तूल, कडतुस व कुकरी घेऊन दुचाकीने फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सूचना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, भास्कर ठाकरे पुना प्रफुल्ल धांडे, अमोल ठाकूर, रतन गीते, ज्ञानेश्वर उन्हाळे यांनी दुपारी ३ वाजता कारवाईत करत संशयित आरोपी निखिल पाटील याला ताब्यात घेतले असून त्याच्यावरील गावठी पिस्तुल, कडतुस, कुकरी जप्त केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे.