रामानंद नगर पोलिसांची गिरणा टाकी परिसरात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील उच्चभ्रू गिरणा टाकी परिसरात कंबरेला पिस्तुल लावून दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या रामानंद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल कीण्यात आली आहे.
शहरातील गिरणा टाकी परिसरात संशयित शुभम उर्फ मणी दिनेश अहिरे (वय २७, रा. सिद्धार्थ हौसिंग सोसायटी) हा कंबरेला पिस्तूल लावून दहशत माजवत असल्याची माहिती निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक विठ्ठल पाटील, पोहेकॉ संजय सपकाळे, इरफान मलीक, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, हेमंत कळसकर, रेवानंद साळुुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने गिरणाटाकी परीसर गाठून संशयीताचा शोध घेतला. संशयीत तरुणाला हटकल्यावर त्यांची अंगझडती घेतल्यावर त्याच्या जवळ गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करीत संशयिताला रामानंदनगर पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.