
धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावात बंद घर फोडून फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावात रमेश सिताराम बडगुजर (वय-६३) हे आपल्या परिवारासह राहायला आहे. १५ जुलै रात्री ९ ते १७ जुलै सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. दरम्यान अज्ञात चोट्याने बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकिला आल्यानंतर रमेश बडगुजर यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू पाटील करीत आहे.









