हनुमान मंदिरात दर्शन घेऊन नारळ वाढवीत प्रचाराचा केला शुभारंभ
जळगाव विशेष प्रतिनिधी

येथील पिंप्राळा भागातील प्रभाग क्रमांक ८ व १० मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी शंकरराव नगर येथील कष्टभंजन हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग क्रमांक ८ अ मध्ये उज्वला कुलभूषण पाटील, ८ ब मध्ये शोभा रवींद्र सोनवणे, ८ क मध्ये मयूर चंद्रकांत कापसे, ८ ड मध्ये पुनमचंद सुपडू पाटील हे उमेदवार लढत देत आहेत. तर प्रभाग क्रमांक १० अ मध्ये कौशल्याबाई उत्तम निकम, १० ब मध्ये पुष्पा विठ्ठल चौधरी, १० क मध्ये हसीनाबी शेख शरीफ, १० ड मध्ये कुलभूषण वीरभान पाटील हे उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शंकरराव नगर येथील कष्टभंजन हनुमान मंदिर येथे शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सर्व उमेदवारांसह माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, प्रतिभा कापसे, शिवसेनेचे संघटक गजानन मालपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हुकूमशाही व पैशांच्या जोरावर हुकूमत गाजवू पाहणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करा. स्थानिक उमेदवारांना विजयी करून चांगले उमेदवार महापालिकेच्या सभागृहात पाठवा, असे आवाहन गजानन मालपुरे यांनी केले. आता आम्हाला बदल हवा आहे. केवळ आश्वासन देणारी नव्हे तर आश्वासन पाळणारे हवे आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला.









