शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि. ३१ जुलै, २०२४ पर्यत मुदतवाढ दिलेली आहे.
या योजनेंतर्गत खरीप २०२४ करिता सहभागाची अंतीम मुदत दि. १५ जुलै २०२४अशी निश्चीत करण्यात आलेली होती. तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन, योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि. ३१ जुलै, २०२४पर्यत मुदतवाढ दिलेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा. तसेच खरीपासाठी एक रुपयात पिक विमा योजनेसाठी काही अडचण आल्यास नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, रविशंकर चलवदे, नाशिक विभाग यांनी केले आहे.