किसान काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) : बोगस कापूस बियाणे कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, २०२३-२४ च्या रब्बी हंगामातील अवकाळी पावसातील पिकविम्याची रक्कम मिळावी, तीन वर्षांपूर्वीच्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी आदी मागण्या किसान काँग्रेसतर्फे तहसीलदाराना दिलेल्या निवेदनामार्फत करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात ८० टक्के मंडळात अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी, कापूस, सोयाबीन पीक पेरा न लावलेल्या मात्र उताऱ्यावर नोंद असल्याना पीकविमा मिळाला आहे तर शासनाच्या अनुदान यादीत त्यांचे नाव नाही तरी यादी अपडेट करावी, तालुक्यात ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर जमीनवर विविध कंपनीच्या कापूस बियाण्याची लागवड केली आहे. १२० दिवस उलटूनही पिकाला फळ नाही, तीन वर्षांपूर्वीच्या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या मोबदला मिळाला नाही आदि समस्या निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत. निवेदनावर किसान काँग्रेसचे कार्यध्यक्ष प्रा सुभाष पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, सचिन बाळू पाटील, प्रताप पाटील, त्र्यंबक पाटील, धनगर पाटील, प्रा. श्याम पाटील, भास्करराव ठाकरे, विनोद बोरसे, योगेश शिसोदे, मनोज सनेर, डी. एम. पाटील, विनोद शिंदे यांच्या सह्या आहेत.