अहमदाबाद ( वृत्तसंस्था ) – बलात्काराचा एक खटला अहमदाबाद सेशन कोर्टामध्ये गेल्या 41 वर्षांपासून सुरू आहे. अद्यापही निकला लागलेला नाही. शेवटी कंटाळून पीडितेनेच ही केस आता बंद करण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली आहे. आता या पीडितेचे वय 55 वर्ष आहे.
न्यायाधीश डी.एम. व्यास यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू असताना या महिलेने आता ही केस बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे. महिलेने न्यायालयात सांगितले की, आता माझे वय 55 वर्ष आहे. बालात्काराच्या घटनेला आता 41 वर्ष उलटून गेले आहेत. आणखी काही काळ या सर्व प्रक्रियेचा भाग बणण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे हा खटला बंद करण्यात यावा.
पीडितेने आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. मुंबईतील एका टॅक्सीचालकावर हे आरोप करण्यात आले होते. ही घटना 30 जुन 1980 रोजीची आहे. जेव्हा बलात्कार झाला तेव्हा पीडितेचे वय 16 वर्ष होते. या घटनेला आता तब्बल 41 वर्ष उलटून गेले आहेत. मात्र तरी देखील अद्यापही या महिलेला न्याय मिळू शकलेला नाही. शेवटी या 55 वर्षीय महिलेनेच आता ही केस बंद करण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली आहे.