जळगाव — माजी विद्यार्थी संमेलनाने महविद्यलय बहरले डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालयात ०५/०४/२०२५ शनिवार रोजी माजी विद्यार्थी संमेलन पारपडेले माजी विद्यार्थ्यांच्या हास्याने आणि उत्साहाने महाविद्यालय परिसर फुलूनउठला होता. कार्यक्रमात विविध प्रकारचे मनोरंजक खेळ खेळण्यात आले तसेच माजीविद्यार्थ्यानी महाविद्यालया प्रती आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालायातील शिक्षणाचा आणि अनुभवाचा खूप छान असा अभिप्राय मांडला, आणि आपल्या जुन्या आठवणी पुनः नव्या करून घेवून गेले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नगुलकर प्राशसकीय अधिकारी श्री. राहुल गिरी तसेच माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक, उपाअध्यक्षा डॉ. कल्याणी नगुलकर, सचिव डॉ. निखिल पाटील आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचरी उपस्तीत होते. कार्यक्रमाचे संचालन ओजस्वी जनबंधू, आस्था पटेल यांनी तर आभार प्रदर्शन शुभम केंद्रे आणि ऋतूजा शारदुल यांनी केले.










