नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानसिकदृष्ट्या अपंग किंवा शारीरिक दुर्बल मुलांनाही कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली आहे
मानसिक किंवा शारीरिक दुर्बल मुलांना यापूर्वी फॅमेली पेन्शनचा लाभ मिळत नव्हता. आपले पालनपोषण करु शकत नसल्याने त्यांना अडचणीला समोरे जावं लागत होते.
. निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी फॅमिली पेन्शनसंदर्भात लोकांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांचा लक्षात आलं पेन्शन देणाऱ्या बँका या शारीरिक दुर्बल किंवा मानसिक आजारी मुलांना या पेन्शनपासून वंचित ठेवतात. अशा मुलांना पेन्शन देण्यासाठी बँका मुलांना कोर्टाने दिलेले पालकत्व प्रमाणपत्र मागतात. त्यामुळे या मुलांना पेन्शनसाठी खूप झगडावं लागतं.
शारीरिक दुर्बल, अपंग किंवा मानसिक आजारग्रस्त मुलांना आपली देखभाल करणे कठिण असतं. अशात त्यांचे आई किंवा वडिल सरकारी कर्मचारी असेल तर त्यांना फॅमेली पेन्शनसाठी लढावं लागतं. त्यामुळे मोदी सरकारने या मुलांना त्रास होऊ नये म्हणून कुटुंब पेन्शनच्या नामांकनामध्ये तरदूर करण्याचा निर्णय घेतला. आता अशा मुलांनाही मृत आई किंवा वडिलांनाची पेन्शन सहज मिळणार आहे. या मुलांना पालकत्व प्रमाणपत्र न्यायालयाकडून मिळावं ही प्रक्रिया पण आता सोपी करण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास बँका लाभार्थी मुलांना पेन्शन नाकारु शकत नाही, असंही जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
एखाद्या अपंग मुलाकडे कोर्टाने दिलेले पालकत्व प्रमाणपत्र नसेल तरीही त्याला पेन्शन देण्यात यावी. बँकांनी या आदेशाचं पालन न केल्यास बँकेकडून केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 वैधानिक तरतुदींचं उल्लंघन होईल. मुलांचं नाव पालकांच्या पेन्शन योजनेत नसेल तर तरीही बँकेने कोर्टाचे प्रमाणपत्र मागितले तरीही हे चुकीचं असणार.