पारोळा ( प्रतिनिधी ) – दिगंबर जैन समुदायाच्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या पर्युषण पर्वाची सांगता अतिशय क्षेत्र कुसुंबा येथे करण्यात आली

मंगलमय वातावरणात या पर्वाची सांगता इंद्र व राहुल शहा व इंद्रायणी प्रिया शहा यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक समापन कार्यक्रमाने झाली. अशोक जैन ( शेंदुर्णी ) , निधी शहा , अभिनंदन शहा , विजया शहा , प्रफुल शहा या सांगता सोहळ्यात सहभागी झाले होते.
पहिल्या दिवशी सतीश जैन तर सौ सुलभा जैन यांच्या हस्ते महापूजानाने दशलक्षण महापर्वाच्या पूजन विधिची सुरुवात करण्यात आली होती.
या दशलक्षण पर्वात प्रतिदिन विविध इंद्र इंद्रायणी द्वारा पूजन , अभिषेक चातुर्मासस्थित तपस्वी सुदेह सागरजी महाराज यांच्या सानिध्यात झाले. उत्तम क्षमा दिनी सौ. सुलभा जैन, उत्तम मार्दव दिनी राजेंद्र जैन, उत्तम आर्जव दिनी प्रदीप जैन, उत्तम शौच दिनी पंकज जैन, उत्तम सत्य दिनी संजय जैन, उत्तम संयम दिनी विजय जैन, उत्तम तप दिनी किरण जैन, उत्तम त्याग दिनी महावीर जैन, उत्तम आकिंचन्य दिनी संजय जैन, उत्तम ब्रह्मचर्य दिनी राहुल शहा यांच्यातर्फे संगीतबद्ध महापूजा सुयोग जैन यांच्याद्वारे झाली .
दहा दिवस शांतीनाथ महामंडळ विधान पूजा प्रतिदिन झाली अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख सतीश जैन , कुसुम्ब अतिशय क्षेत्राचे विश्वस्त महेंद्र जैन यांनी दिली. दानोळीकर सुयोग जैन नमोकार कलामंचने भक्तिगीत आणि कुंथुनाथ भगवान यांच्या गीताने व पूजनाने भाविकांची मने जिंकली. पार्श्वनाथ सेवा मंचाने सादर केलेल्या महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रमास सर्वांनी मनापासून दाद दिली पार्श्वनाथ सेवा व पद्मावती युवा मंचाने तन-मन-धनाने सेवा केली धार्मिक महोत्सव समाजातील दुफळी दूर करून एकी चैतन्य निर्माण करून अहिंसामय धर्माचा प्रचार प्रसार करतात.







