जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील घटना ; १० वर्षीय बालक मृत्युमुखी
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील म्हसावद गावाच्या शेजारी शौचास गेले असताना दोन भावंडांचा पाय घसरून तोल गेल्याने ते नदीत कोसळले. काही तरुणांना ते दिसताच त्यांनी नदीपात्रात उड्या टाकल्या. त्यात दोघांपैकी लहान भावाचा बुडाल्याने मृत्यू झाला. तर मोठ्या भावाला वाचवण्यात यश आले. ही घटना म्हसावद येथे रविवारी दुपारी २ वाजता घडली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हसनैन रफिक शेख (वय १०) असे मृत बालकाचे नाव आहे. आर्थिक मदतीची मागणी हसनैन शेख याचे वडील हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याचा मृतदेह तीन तासांच्या प्रयत्नानंतर घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर नदीपात्रात सापडला. हवालदार स्वप्निल पाटील, मंडळ अधिकारी अजिंक्य जोंधळे व बचाव पथक जळगाव येथून दाखल झाले होते. दरम्यान, हसनैन शेख याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.