डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञांचे उल्लेखनीय यश
जळगाव ( प्रतिनिधी ) – अपघातामुळे उजवा पाय गमावलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचे यशस्वी पुनर्वसन डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले. या उपचारप्रक्रियेने नवे जीवन मिळवलेला हा रुग्ण आता पुन्हा चालू लागला आहे आणि त्याच्या आयुष्यातील नवी पहाट उजाडली आहे.
याबाबत माहिती अशी की, गणेश तळेले नामक तरूणाचे अडीच महिन्यापूर्वी लग्न झाले होते. सुखी संसाराची स्वप्ने पाहणारे ह्या दाम्पत्याच्या जीवनात अत्यंत दु:खद घटना घडली. दुचाकीवर जात असतांना दीपनगर औष्णिक केंद्राजवळील महामार्गावर दाम्प्यत्याचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायाच्या हाडांचे अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते आणि रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे पाय वाचवणे शक्य नव्हते. अशा परीस्थितीत त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद सारकेलवाड यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वैद्यकीय दृष्टिकोनातून उजव्या पायाचे प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे ठरवले. या कठीण टप्प्यावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञांनी रुग्णाचे योग्य निदान करत तातडीने शस्त्रक्रिया केली. प्रथम फ्रॅक्चर झालेल्या हाडांचे फिक्सेशन करून परिस्थिती नियंत्रित करण्यात आली. त्यानंतर पुढील उपचारांचा भाग म्हणून कृत्रिम पाय बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जयपूर फुट ट्रस्टच्या सहकार्याने गणेशच्या पायाचे कृत्रीम प्रत्यारोपण करण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रमोद सारकेलवाड आणि डॉ. नरेंद्र शिरसाठ यांना डॉ. पियूष पवार, डॉ. शुभम अडकिने, डॉ. गौतम कुंभार, डॉ. नरेंद्र लव्हाडे, भूलशास्त्र तज्ञ डॉ. हेमंत मापारी यांनी सहकार्य केले.
फिजीओथेरेपी विभागाचे सहकार्य
कृत्रिम पाय बसविल्यानंतर फिजिओथेरपीच्या मदतीने रुग्णाच्या चालण्याच्या क्षमतेचा पुनर्विकास करण्यात आला. प्रारंभी चालण्यास त्रास होत होता, मात्र फिजीओथेरेपीस्ट डॉ. सौरभ पाटील यांच्या टीमने नियमित व्यायाम व उपचार यामुळे रुग्ण लवकरच स्वबळावर चालू लागला. केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक दृष्टिकोनातूनही त्याचे पुनर्वसन करण्यात आले. या यशस्वी उपचार प्रक्रियेबद्दल बोलताना रुग्णाने आनंद व्यक्त केला आणि डॉक्टरांप्रती कृतज्ञता दर्शवली. मी पुन्हा स्वतःच्या पायांवर उभा राहिलो, हे फक्त डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले,
अपघातात पाय गमावल्याने रुग्णाचे मनोधैर्य कमी होते. अशा रुग्णांना खूप संवेदनशीलतेने ट्रिटमेन्ट दयावि लागते. कृत्रिम पाय बसवल्याने रुग्णाला चालता येते म्हणून रुग्णाचे मनोधैर्य ऊंचावते. त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांसारखे जीवन जगण्याचा उत्साह येतो तसेच त्यांचा आत्मविश्वास ऊंचावतो.

डॉ. प्रमोद सारकेलवाडजॉईंट रिप्लेसमेंट व स्पाईन सर्जन