अमळनेर (प्रतिनिधी) :- नुकत्याच झालेल्या पावसाने तालुक्यातील ३५ गावांमधील १४ हजार ४८ शेतकऱ्यांच्या ९ हजार ६२५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी दुष्काळ आणि यावर्षी अतिपावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. २५ व २६ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले होते. पावसामुळे काढलेला मका चिखलात गेला. एकूण ९ हजार ६२५ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाले आहे.
कापूस लागवड केलेल्या ७ हजार १३९ हेक्टर , मका १ हजार ७५९ हेक्टर, ज्वारी २४८ हेक्टर, बाजरी २५७ हेक्टर, उडीद ४९ हेक्टर, तूर ४८ हेक्टर, सोयाबीन ७३ हेक्टर, इतर ५२ हेक्टर असे एकूण ९ हजार ६२५ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे यांनी नुकसानीचा आढावा घेऊन वरिष्टाना अहवाल पाठवला आहे.