जळगाव पंचायत समितीत सीईओंची उपस्थिती
जळगांव (प्रतिनिधी) :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आगामी पावसाळ्याच्या दिवसात निर्माण होणाऱ्या संभाव्य घट्नांच्या पार्श्वभूमीवर जळगांव पंचायत समिती येथे गुरुवार दि. २२ मे रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबिरावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणाबाबत माहिती जाणून घेतली.
आगामी पावसाळ्याच्या काळात उद्भवणारे संभाव्य आपत्तीचे प्रसंग टाळण्यासाठी व तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात स्वयंसेवकांची टीम उभारण्यात येत आहे. या टीमच्या माध्यमातून जिल्हाभरात आपत्तीच्या काळात मदत करणाऱ्या स्वयंसेवकांची एक फौज उभी राहणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगांव पंचायत समिती येथे गुरुवारी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी उपस्थित राहून करनवाल यांनी प्रशिक्षणाची पाहणी केली. यावेळी जळगांव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी श्वेता पालवे उपस्थित होत्या.