स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- अवैध गुटख्याची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून मुद्देमालासह अटक केली आहे. सदरची कारवाई ही जळगाव शहरातील न्यू सम्राट कॉलनी येथे करण्यात आली.
शहरातील न्यू सम्राट कॉलनी येथील संशयित आरोपी शुभम नरेश कुमार हंडी हा त्याची दुचाकी क्रमांक (एम एच १९ ईडी ४०१४) वरून डिकीत व त्याचे राहते घराच्या खोलीत प्रतिबंधित गुटखा विक्रीकरिता बाळगून असलेला आढळून आला. तो त्याची चोरटी विक्री व वाहतूक करीत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल २ लाख ७४ हजार रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डी वाय एस पी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, रवी नरवाडे, संजय हिवरकर, हरीलाल पाटील, राजेश मेंढे, विजय पाटील, अक्रम शेख, प्रदीप चवरे यांनी केली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.