जळगाव (प्रतिनिधी ) ;- गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जळगाव शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. काहींची तारांबळ उडाल्याचे चित्रही पाहायला मिळाले. रविवार सुटीचा दिवस असल्याने फारशी वर्दळ मुख्य बाजारपेठ आणि रस्त्यांवर नसल्याने नागरिकांनी घरीच बसून पावसाचा आनंद घेतला. दरम्यान आज दुपारी झालेल्या दमदार पावसाच्या आगमनाने शेतकरी वर्गासह व्यापारी वर्गही सुखावला आहे.








