जळगाव शहरात हरिविठ्ठल नगर येथे एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात अवैध धंद्यांविरुद्ध सुरु करण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीतील हरीविठ्ठल नगर भागात पत्याच्या अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत ९ संशयित आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा एकूण ३ लाख १४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शरद बागुल यांच्या नेतृत्वाखाली ८ ऑगस्ट रोजी रात्री १०.१५ वाजता छापा टाकण्यात आला. ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ चे कलम १२(अ) अंतर्गत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, तसेच स्थानीक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागुल, पोहवा अक्रम शेख, विजय पाटील, नितीन बावीस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, व पोशि रविंद्र कापडणे यांचा समावेश होता.