जळगाव (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खा. डॉ. उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून गोदावरी फाउंडेशनतर्फे १७ सप्टेंबरपासून स्वस्थ माता, सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सर्व प्रकारच्या तपासण्या शिबीरात मोफत केल्या जाणार आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवेचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. गोदावरी फाउंडेशनतर्फे बुधवारी दि. १७ पासून अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दि. १७ रोजी जळगाव तालुक्यातील कडगाव, भुसावळ, नशिराबाद येथे मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर होणार आहे. दि. १८ रोजी भुसावळ, जळगाव तालुक्यातील कढोली, दि. १९ रोजी जामनेर तालुक्यातील गारखेडा, दि. २० रोजी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव, भुसावळ, दि. २२ रोजी जळगाव खुर्द, दि. २३ रोजी पिंपळगाव देवी, दि. २४ रोजी भुसावळ येथील बद्री प्लॉट, खडका, दि. २६ रोजी जळगाव खुर्द, दि. २७ रोजी पिंप्री, सोयगाव, भुसावळ, दि. २८ रोजी भुसावळ, दि. २९ व ३० रोजी जळगाव खुर्द आणि दि. १ व २ ऑक्टोबर रोजी भुसावळ येथे तपासणी शिबीर होणार आहे. या शिबीरात सहभागी होणार्या नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार असून गरजू रूग्णांना आरोग्यविषयक उपचारासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी या शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.