चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे शासकीय महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या एका विरोधात पिडीतेच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पिडीत महिला ही ११ जानेवारी २०२२ दुपारी ३ वाजता कार्यालय बंद करत असतांना कार्यालयीन सहकारी सुनील कायस्थ याने तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता केली तर त्या महिलेस व तिच्या मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेने पीडिता घाबरून गेली होती. यादरम्यान तिला बरे वाटत नसल्याने डॉक्टरांनी तपासणी केली असता ती कोरोना पॉझीटीव्ह आढळून आली होती. यामुळे तिने घरीच उपचार घेतले. आता तिला बरे वाटत असल्याने तिने हा सर्व प्रकार आपल्या वरिष्ठांना दि. २८ जानेवारी रोजी सांगितला. यानंतर आज दि. २९ रोजी पिडीतेच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सुनील कायस्थ याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.