जळगावातील रामेश्वर कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील रामेश्वर कॉलनी येथे दुःखद घटना घडली आहे. ८१ वर्षीय पत्नीचे निधन झाले. हा धक्का पत्नी सहन करू शकले नाही. त्यामुळे हृदयविकाराने त्यांचेहि काही तासांनी निधन झाल्याची घटना बुधवारी उघड झाली आहे. या घटनेने रामेश्वर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामेश्वर कॉलनीत ८६ वर्षीय शालिग्राम दामू पाटील यांचे कुटूंब वास्तव्यास होते. शालिग्राम पाटील यांनी शेतीकाम करून आयुष्य घालविले. बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता प्रमिलाबाई शालीग्राम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी २ वाजता त्यांना ह्दयविकाराने हेरले. प्रमिलाबाईंसोबत त्यांचेही निधन झाले. एकानंतर दुसरी वेदनादायी घटना घरात घडली म्हणून मातृ-पितृछत्र हरपलेल्या या घराला अश्रूंनी चिंब केले. यावेळी कुटुंबीयांनी दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रमिलाबाई आणि शालिग्राम पाटील यांच्यावर गुरुवारी सकाळी रामेश्वर कॉलनीच्या नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.