जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील घटना
नरेंद्र काकडे असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. त्यांची पत्नी रुपाली नरेंद्र काकडे (३४, रा. रामेश्वर कॉलनी) या जखमी झाल्या आहेत. नरेंद्र काकडे याने दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. त्याचा जाब पत्नीने विचारल्याचा राग आल्याने त्याने पत्नी रुपाली यांच्या गळ्यावर आणि खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी रुपाली काकडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नरेंद्र काकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.