जळगाव ( प्रतिनिधी ) – स्व. गोदावरी आई पाटील यांच्या दु:खद निधनानंतर राज्यभरातून पाटील कुटुंबाचे सांत्वन केले जात आहे. शुक्रवारी १२ रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, सुभाषदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनीही स्व. गोदावरी आई यांना अभिवादन करीत पाटील परिवाराचे सांत्वन केले. याप्रसंगी डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते.