• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2025
in Uncategorized
0
पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

उपासमारीची वेळ आल्याने विक्रेत्यांचा टाहो  : महापालिकेच्या उपायुक्तांना निवेदन देऊन वेधले लक्ष

जळगाव ( प्रतिनिधी ) : – जळगाव शहरातील महात्मा फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमधील शेकडो हॉकर्स विक्रेत्यांवर १ जून २०२५ पासून जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमुळे उपासमारीची वेळ आली आहे. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत हॉकर्सचे व्यवसाय बंद पडले असून, त्यांच्या कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पथविक्रेता समिती गठीत झाली असून तात्काळ कार्यान्वित करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन हॉकर्स बांधवांतर्फे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना देण्यात आले आहे.

महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केट हॉकर्स युनियन, जळगाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिक्रमण पथकाच्या कारवाईमुळे हॉकर्स बांधवांचे व्यवसाय पूर्णपणे थांबले आहेत. जून महिन्यात शाळा सुरू झाल्याने मुला-मुलींच्या शिक्षणावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर कुटुंबातील वृद्ध आई-वडिलांच्या औषधोपचाराचा प्रश्नही गंभीर बनला आहे. रोजचा प्रपंच चालवणेही कठीण झाल्याने अनेक हॉकर्स अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. युनियनने म्हटले आहे की, फुले मार्केटमधील बहुतांश हॉकर्स २५ ते ३० वर्षांपासून येथे व्यवसाय करत आहेत आणि ते सर्व नोंदणीकृत आहेत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार अंमलबजावणी करण्याची आणि पथविक्रेता समिती  गठीत झाल्यामुळे हॉकर्सना फुले मार्केटमध्ये पांढरे पट्टे आखून योग्य नियोजन करून पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

या गंभीर परिस्थितीत, प्रशासनाने राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार हॉकर्सच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा, या हॉकर्सच्या कुटुंबांवर मोठ्या आर्थिक संकटाचा डोंगर कोसळण्याची भीती आहे. अध्यक्ष नंदू वसंत पाटील, सचिव सचिन जोशी, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, पथविक्रेता समितीचे सदस्य मोहन तिवारी, गोविंदा कुंभार, समाधान पाटील, रवी चौधरी, बापू चौधरी पिंटू शिंदे बापू कोळी, भूषण कोळी, सादिक मणियार, भैया चौधरी, कन्हैया गवळी, बबलू चौधरी, गोपी सोनार, भूषण सोनवणे, शिवम राजपूत, सचिन माळी, संदेश अलई, अनिस मणियार, गणेश जाधव, हरीश काळे, लक्ष्मण शिंदे, टेलर नाना आदी हॉकर्स बांधव निवेदन देताना उपस्थित होते.


 

Previous Post

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

Next Post

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon