यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील पथराळे येथे एका शेतमजुराने दुपारी जेवण केल्यावर त्याला त्याची प्रकृती गंभीर झाली त्यानंतर नागरिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांना त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

रोहिदास मारूती कोळी (रा.राकोलाड तालुका रोहा जिल्हा रायगड; ह.मु.पथराळे तालुका यावल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रोहिदास कोळी यांनी दुपारी जेवण केल्यानंतर अचानक उलट्या होत असून त्यांना त्रास जाणवू लागला. नागरिकांनी त्याला तात्काळ मनवेल येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले . मात्र दवाखान्यात पोहोचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचा मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या घटनेची रमेश जाधव (रा.राकोलाड तालुका रोहा जिल्हा रायगड) यांनी यावल पोलीसात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे तपास करीत आहे.







