अॅपमध्ये माहिती भरून करणार नोंद
जळगाव (प्रतिनिधी) : सप्टेबर महिन्यापासून पशुसंवर्धन विभागाकडून पशुगणनेला सुरुवात केली जाणार असुन यासाठी शासनाने घरोघरी जावून गणना करणाऱ्या प्रगणांकाची माहीती मागविली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असुन अॅपमध्ये ही माहीती संकलीत करून डिसेंबर पर्यंत शासनाला पशुगणनेची आकडेवारी कळविली जाणार आहे. त्यामुळे पशूपालकांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रशासनासह राज्य शासनाकडून दर पाच वर्षांत पाळीव पशु अर्थात जनावरांची गणना केली जात असते. १९९९ ही पशु गणना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात २० वी पशु गणना ही २०१९ मध्ये झालेली होती. देशासह राज्यात २१ ची पशुगणना केली जाणार असून यात राहिलेल्या जनावरांचे देखील टॅगिंग केले जाणार आहे. जिल्हाभरात पशुगणना करण्यासाठी ३ हजार घरांसाठी एक प्रगणक देण्यात येणार असुन त्या माध्यमातून घरोघरी पशुपालकांच्या भेटी घेवून जणांवरांची नोंदणी केली जाणार आहे. जिल्हयासह शहरी भागात पशुगणना करण्यासाठी प्रगणकांची नियुक्ती राहणार आहे. त्यात ग्रामिण भागात २११ प्रगणक तर शहरी भागासाठी ८४ प्रगणक काम पहाणार आहे.
या प्रगणकांकडून गाव, म्हैस, कुत्रे, घोडा, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यासह पाळीव प्राण्यांची नोंद केली जाणार आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापुर्वी करण्यात आलेल्या पशुगणनेनुसार गायवर्गीय पशुधन सर्वाधिक आहे. त्याची संख्या ५ लाख ७० हजार ३०२ असुन म्हैस वर्गीय पशुधनाची संख्या २ लाख ६९ हजार १०५ आहे. शेळयांची संख्या ३ लाख ३३ हजार १५६ असुन मेंढ्यांची संख्या ७० हजार ४७१ आहे कोंबड्यांची संख्या ९ लाख ९८ हजार ८२५ आहे. तर गाय व म्हैसवर्गीय मधील प्रजननक्षम जनावरांचा आकड़ा २ लाख ३३ हजार आहे.