जामनेर (प्रतिनिधी) : राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांनी जामनेर येथील निवासस्थानी परिवार व कार्यकर्ते यांच्यासमवेत पर्यावरण पूरक पध्दतीने धुलीवंदन साजरे केले.
यावेळी नगराध्यक्ष साधनाताई महाजन उपस्थित होत्या. धुलीवंदनाच्या रंगांप्रमाणे आपल्याही जीवनात सुख, समृध्दी, यश, संपत्ती, आनंद, सकारात्मकता व भरभराटीच्या सप्तरंगांची उधळण व्हावी या शुभेच्छा या वेळी ना.गिरीश महाजन यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच नागरिकांनी देखील पर्यावरण पूरक होळी साजरी करावी असे आवाहन करण्यात आले व शुभेच्छा दिल्या.