धरणगाव तालुक्यात सर्वत्र आनंद
धरणगाव (प्रतिनिधी) : शिंदखेडा तालुक्यातील परसोडे येथील प्रगतिशील शेतकरी नंदलाल भास्कर जाधव यांची सुपुत्री विद्या हिने दादासाहेब रावल कॉलेज दोंडाईचा इथे बीएसस्सी (मॅथेमॅटिक्स) पदवी पूर्ण केल्या. नंतर स्पर्धा परीक्षा एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये प्रवेश घेतला. विद्या हिने मोठया जिद्दीने, परिश्रमाने, चिकाटीने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदाची परीक्षा उत्तीर्ण करून गावाचा व तालुक्याचा मान उंचावला आहे.


लहानपणापासून कुशाग्र बुध्दीमत्ता व नम्र असलेली विद्या भविष्यात उतुंग यश मिळवेलच याची शाश्वती सर्वांना होती. प्रतिकूल परिस्थितीत तीने यशोशिखर गाठल्याने परसोडे व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.तिला या यशात उमेश कुदळे, महेश पाटील , उत्तम पवार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्या हिने उज्वल यश संपादन केल्याबद्दल तिचे पंचक्रोशीतील नागरिकांनी, माता-पिता, मित्र परिवाराने यांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
तसेच भगवती मेडीकल सोनवद ता. धरणगावचे भाऊसाहेब पाटील, प्रेमराज पाटील, डॉ. नितीन पाटील, चंद्रशेखर भाटिया, बाळू आबा पाटील, दिलीप धनगर, उज्वल पाटील, विकास पाटील या सर्वांनी विद्या हिच्या यशाचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी, कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
=









