पारोळा तालुक्यातील मोहाडी येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील मोहाडी येथील ३८ वर्षीय तरुण हा मासे पकडण्यासाठी पाटाच्या चारीजवळ गेला असता त्याच्या पाय घसरून पाण्यात पडून बुडून मरण पावल्याची घटना दि. १७ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात राजु रामसिंग भिल रा. मोहाडी ता पारोळा यांनी खबर दिली.
सुनिल अनिल भिल (वय ३८ वर्ष, रा. मोहाडी) हा भोकरबारी धरणाला लागुन असलेल्या पाटावर मासे पकडण्यासाठी दि. १७ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गेला होता. त्यानंतर दुपारी २. वाजेच्या सुमारास सुनिल भिल हा मासे पकडत असतांना पाय घसरुन पाटाच्या पाण्यात पडला. तेव्हा तो पाटाच्या काठावर अर्धवट पाण्यात बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसला. त्यानंतर १०८ अॅम्बुलन्सने कुटीर रुग्णालय पारोळा येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुनिल यास तपासुन मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास साळुंखे हे करीत आहेत