जळगाव ( प्रतिनिधी ) – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वात पारोळा येथे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी आर.बी.पाटील (तालुका प्रमुख), चंद्रकांत पाटील (माजी .नगराध्यक्ष), अशोक मराठे (शहरप्रमुख), आबा महाजन (शहर प्रमुख), सावंत शिंपी (युवासेना उपशहर प्रमुख), चेतन पाटील (तालुका .समन्वयक ) , राजूभाऊ कासार (माजी .नगरसेवक) , राजूभाऊ जावरे (दलीत सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष), अशोक कापडणे (आर.पी.आय.तालुका .अध्यक्ष), राकेश जावरे (लोक जनशक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष), किरण पाटील (उपसरपंच चोरवड) , अनिल पाटील (माजी सरपंच चोरवड) , जगदीश पाटील, सतीश पाटील , बबलू माने, विलास वाघ यांच्यासह शिवसेना, युवासेना, महीला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.