पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील कुटीर रूग्णालयात भाजपकडून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप आणि नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले.
पारोळा शहरात अनेक दिवसांपासून कोव्हीड लसींचा तुटवडा असल्याने अनेक नागरिक लसीकरण करण्यासाठी ताटकळत होते . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारोळा तालुका भाजपातर्फे जिल्हा लसीकरण प्रमुखांकडे ग्रामीण रूग्णालयाकडून लस उपलब्ध व्हावी याकरिता पाठपुरावा सुरु होता . अतिरिक्त लस उपलब्ध करून दयावी म्हणून भाजपातर्फे मागणी पत्र देखील देण्यात आले होते. मागणी मंजूर करित पारोळा ग्रामीण रुग्णालयास 500 लस तर भाजपाकडून करण्यात आलेल्या मागणी नुसार 1000 लस अशा 1500 लसी उपलब्ध करून देण्यात आल्या .
लस उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, संघाचे व भाजपाचे कार्यकर्ते यांच्याकडून नोंदणी करण्यात आली डॉ प्रशांत गुजराथी , डॉ धनराळे ,विदया अहिरे , राखी बडगुजर , विनय कांबळे यांचे मारफत लसीकरण करण्यात आले. भाजपाकडून नागरिकांना चहापाणीची व्यवस्था करण्यात आली. तालुकाध्यक्ष अँड अतुल मोरे , शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी , जिल्हा उपाध्यक्ष सौ रेखा चौधरी , जिल्हा चिटणीस रवींद्र पाटील , जिल्हा शिक्षक आघाडीचे जितेंद्र चौधरी , नरेंद्र राजपूत , सरचिटणीस सचिन गुजराथी , गणेश पाटील , विनोद हिंदुजा , अमोल चौधरी , गौरव बडगुजर , समिर वैद्य , माणिकलाल जैस्वाल , अँड गणेश पाटील , अनिल लोहार , नयन चौधरी , स्वप्निल महाजन , जयेश चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राजूभाऊ वानखेडे यांचेही सहकार्य लाभले.