जळगाव ( प्रतिनिधी ) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळ्यात जाऊन गुप्त माहितीच्या आधारावर आज पारोळ्यात जाऊन तेथील मोबाईल चोराच्या मुसक्या आवळल्या या चोराला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव जिल्हयांत मोबाईल चोरीचे जबरी गुन्हे घडत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक. चंद्रकांत गवळी व चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक .किरणकुमार बकाले यांनी मोबाईल चोरांच्या
शोधासाठी गवेगळी पथके तयार केली होती.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पारोळा शहरात चेतन पाटील हा रेकॉर्डबरील गुन्हेगार चोरीचे मोबाईल विक्रीसाठी फिरत आहे असे समजले होते . त्याप्रमाणे सफौ विजय पाटील,पोहेकॉ जयंत चौधरी, सुनिल दामोदरे, दिपक पाटील, संदिप साळवे, पोना नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगबान पाटील,पोकॉ सचिन महाजन या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना पारोळा गावी रवाना केले होते .
या पथकाने पारोळा गावात माहिती घेतली असता संशयीत आरोपी चेतन पाटील (वय २२ , रा.- शनिमंदिर चौक, पारोळा) नेशनल हायवे क्र.६ अमळनेर रोडवर मिळून आल्यावर त्यांची अंगझडती घेतली. अंगझडतीत दोन मोबाईल हॅण्डसेट मिळून आले. मोबाईलबाबत त्यास विचारपुस केल्यावर त्याने सांगितले की, दोन्ही मोबाईलपैकी एक मी व माझा मित्र सागर पाटील ( रा.शनिमंदिर चौक, पारोळा ) याने कुऱ्हे (ता.अमळनेर) रोडवरील नेहा रसवंतीसमोरुन एका इसमाचे हातातून हिस्काविला आहे. व दुसरा मोबाईल आंचळगाब (ता.भडगाव ) गावाचे पुढे एका इसमाचे हातातुन हिस्काविला आहे. त्याबाबत अमळनेर
व भडगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून माहिती घेतली असता मोबाईलचोरीचे गुन्हे दाखल असून गुन्हयांच्या फिर्यादीतील चोरीस गेलेला मोबाईल हेण्डसेटचे 11 नंबर पहाता आरोपी चेतन पाटील यांचे अंगझडतीत मिळून आलेले मोबाईल हेण्डसेट नंबर एकच असल्याची खात्री झाल्याने मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन त्यास अमळनेर पोलीस स्टेशनला मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले अटक केलेल्या आरोपीविरुध्द मोटार सावकल चोरीचे गुन्हेही दाखल आहेत .







