पारोळा (प्रतिनिधी) – डॉ. व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय व आप्पासाहेब यू एच करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सौ एम यू करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयातील एस एस सी परीक्षा 2021 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न पारोळा श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित डॉ. व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय व आप्पासाहेब यू एच करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सौ एम यू करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयात मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांच्या सत्काराचे आयोजन आज बालाजी शैक्षणिक संकुलात करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष श्री यू एच करोडपती सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ सचिन बडगुजर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजय बडगुजर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत कुमार पाटील तसेच इंग्लिश मिडीयम चे प्राचार्य श्रीकांत पाटील हे होते यात शंभर पैकी शंभर टक्के गुण प्राप्त करणाऱ्या मंथन सचिन बडगुजर 100% पियुष हेमांतकुमार पाटील 100% संतनू अजय दाणेज 100% तसेच 95%पेक्षा जास्त गुण मिळवणारे प्राजक्ता सूर्यवंशी 99.60% सौरभ चांदवडे99.60% गुंजन कुंभेकर 99.40% प्राची पाटील 99.40% चिन्मय नितीन विसपुते 98% ऋतुजा अधिकार पाटील 97.80% साक्षी योगेश येवले 97.40% अनुराग दिलीप ठाकरे 96.80% या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थी मनोगतात प्राजक्ता सूर्यवंशी व गुंजन कुंभेकर यांनी आपले विद्यालया विषयी असलेले प्रेम व शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन यामुळेच आम्ही आज हे यश संपादन करू शकलो आमच्या पंखांना बळ श्री करोडपती सर यांनी लावलेल्या शैक्षणिक वटवृक्षाच्या फांदीवरून उंच भरारी घेण्यासाठी बळकट झाल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या माझ्या डोळ्यात आनंदाश्रू असल्याचेही प्राजक्त सूर्यवंशी तिने आपल्या मनोगतात म्हटले अध्यक्षीय भाषणात आपल्या यशाची परंपरा कायम ठेवणाऱ्या शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे कौतुक केले तर हाडाचे शिक्षक विद्यार्थ्यांना मेहनतीने घडवितात विद्यार्थी पूर्णपणे यश संपादन करतात यातच विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे श्रेय आहे विद्यार्थ्यांनी तेथील शिस्त व अभ्यासाची जिद्द कायमस्वरूपी अंगीकृत करावी उंच भरारी घ्यावी येणारा काळ हा खूप कॉम्पिटिशन असणार आहे.

त्यामुळे आपली चिकाटी व जिद्द नेहमी असली पाहिजे कुठल्याही संकटाला खचून न जाता उमेदीने उभारीने पुढे जात राहिले पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या त्या नंतर सचिव डॉ सचिन बडगुजर हेमंत पाटील सर पालक दिलीप ठाकरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य विजय बडगुजर सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री व्ही एन पाटील सर यांनी केले तसेच आभार दीपक भावसार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.







