पारोळा (प्रतिनिधी) – आज शिवसेना व युवासेनेची पारोळा शहराची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले कि, राज्यात आपली सत्ता असुन राज्य शासनामार्फत विविध विभागातील योजना गरिब-गरजु व्यक्तींपर्यंत पोहचवा. तसेच आपापल्या क्षेत्रात संघटेनेचे काम जोमाने वाढवण्यासाठी संघटेनेचे विचार घरोघरी पोहोचवा.
आबासाहेबांच्या माध्यमाने गोर-गरिब, शेतकरी जनतेच्या समस्यांचे निवारण करा. शासकीय योजनांचा लाभ संबंधितांना मिळवुन द्या अश्या सुचना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केल्या. या बैठक प्रसंगी शेतकी संघाचे व्हा.चेअरमन श्री.भिकनआप्पा महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.श्री.आर.बी.पाटील सर, शिवसेना शहरप्रमुख श्री.अशोकभाऊ मराठे, श्री.रमेशआप्पा महाजन, मा.नगरसेवक श्री.राजेंद्र कासार, शेतकी संघ संचालक श्री.चेतन पाटील, मा.शहरप्रमुख श्री.बापु मराठे, शिवसेना उपशहरप्रमुख श्री.भुषण भोई, युवासेना शहरप्रमुख श्री.आबा महाजन, श्री.बापु महाजन सर, श्री.छोटु चौधरी, श्री.अरूण चौधरी, श्री.पी.आर.पाटील, श्री.संजय गोसावी सर, श्री.प्रकाश पाटील, श्री.अमजद खान, श्री.जिवन मराठे, श्री.अमोल पाटील, श्री.राजु बागडे, शुभम शिंपी, सिध्दार्थ जावळे, ज्ञानेश्वर बारी, बापु मराठे, विनोद पाटील, मयुर मराठे, राजु पाटील, भैय्या महाजन, प्रशांत पाटील, बाळु पाटील, अस्लम खाटीक, पिन्टु बारी, विवेक महाजन, समाधान मगर, अंकुश मराठे, शुभम बोरसे आदी उपस्थित होते.








