पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यात सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांचा पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापसावर यावर्षी लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यापाठोपाठ बोंड आळी कापसावर आल्याने शेतकऱ्यांचे पूर्णतः कंबरडे मोडले गेले.
शेतीच्या बाबतीत हाडाचा शेतकरी असलेला नगदी पीक असणारा कापूस यावर्षी पाठ दाखवून गेला शेतकऱ्यांना उत्पादन खर्च न निघता कर्जाच्या डोंगरात पुन्हा गाडून गेला तरी शासनाने सर्व बाबी लक्षात घेता सर्व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात असे निवेदन शेतकरी संघटना पारोळा कडून तहसीलदारांना देण्यात आले.
अतिवृष्टी बाधित झाल्याने शेतकऱ्यांचा कापूस, ज्वारी, बाजरी, मका तसेच कापूस लाल्या रोग व बोंड आळी अनुदान लवकरात लवकर द्यावे कापूस ज्वारी बाजरी मका सोयाबीन या पिकांचा पिक विमा त्वरित द्यावा. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत पारोळा तालुक्याचा विशेषतः समावेश करावा नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान लवकरात लवकर प्राप्त करून द्यावे असे निवेदन देण्यात आले व शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेने आपबिती पाडा तहसीलदारांना समोर मांडला त्याबरोबर पारोळा कृषी विभागाला कायमस्वरूपी कृषी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी असेही शेतकरी संघटनेने आवर्जून सांगितले व कृषी विभागाला सुद्धा निवेदन दिले निवेदनाच्या प्रती माहितीस्तव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, कृषि मंत्री महाराष्ट्र राज्य, पालक मंत्री जळगाव जिल्हाधिकारी जळगाव आमदार चिमणराव जी पाटील, एरंडोल – पारोळा यांना द्वारा पाठवण्यात आल्या.