पारोळा तालुक्यात शेळावे खुर्द येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेळावे खुर्द येथील ३४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दि. ९ रोजी घडली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विकास दगडु सांगळे (वय ३४ वर्षे रा. शेळावे खु. ता. पारोळा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर विविध प्रकारचे कर्ज असून यावर्षी देखील पावसाने अवकृपा दाखवल्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांनी दि. ७ ऑक्टोंबर रोजी जुने राहत्या घरी भिंतीला असलेले लाकडी खुटीस सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर ग्रामस्थांनी, इतर नातेवाईकांनी विकास दगडू सांगळे कुटीर रुग्णालय, पारोळा येथे आणले असता डक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले. ईश्वर उखा सागळे यांनी खबर दिली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास साळुंखे हे करीत आहेत.