अनुसूचित जाती ४, अनुसूचित जमाती ११, ओबीसी १९ राखीव
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतांची सरपंचपदाची सोडत सोमवार, दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात आली. याप्रसंगी पारोळा येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आरोही निलेश माळी हिच्या हातून, तर प्रभारी तहसीलदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. याप्रसंगी नायब तहसीलदार शांताराम पाटील, नायब तहसीलदार अश्विनी मराठे ग्रामीण भागातून ग्रामस्थ उपस्थित होते.
यात अनुसूचित जाती ४, अनुसूचित जमाती ११, नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी १९ अशी सोडत काढण्यात आली. उर्वरित ५० ग्रामपंचायतीचे सरपंच पदे सर्वसामान्य जनरल असणार आहे. सोमवार दुपारी २ वाजता पारोळा तहसील कार्यालयात सरपंचपदाचे आरक्षण एरंडोल विभागाचे उपविभागीय महसूल अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले.
यात ८४ पैकी ४३ जागा महिला सरपंच करिता राखीव निघाले आहेत. महिला आरक्षणात अनुसूचित जाती २ ग्रा.पं., अनुसूचित जमाती ६ ग्रा.पं. नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी १० ग्रा.पं. सर्वसामान्य महिला २५ अशा ४३ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव निघाल्या आहेत. याप्रसंगी प्रभारी तहसीलदार अनिल पाटील नायब तहसीलदार शांताराम पाटील नायब तहसीलदार अश्विनी मराठे हे उपस्थित होते तसेच याकरिता दिनेश भोई यांनी सहकार्य केले.
सर्वसाधारण महिला आरक्षण : (खुला) २५ हिवरखेडे सिम (आरक्षणाचा लाभ न घेतल्याने पुर्व), भोंडणदिगर, विचखेडे पिंपळकोठे, देवगांव, ढोली, मुंदाणे प्र.अ., सावखेडे तुर्क, लोणी सिम, बाहुटे, लोणी बु, बोदडे, लोणी खु, पळासखेडे सिम, वेल्हाणे खु, हणमंतखेडे, शेळावे बु, बाभळेनाग, वाघरे, करंजी बु, तरवाडे खु, सावळखेडे, रताळे, उंदिरखेडे, इंधवे. वरील प्रमाणे सर्वसामान्य महिला आरक्षण निघाले आहेत. अनुसूचित जाती महिला : २ सबगव्हाण प्र.अ, तामसवाडी, अनुसूचित जाती पुरुष चोरवड, बहादरपुर, अनुसूचित जमाती पुरुष ५.- टेहू, म्हसवे, वसंतवाडी, शेवगे प्र.ब, शिवरेदीगर.
अनुसूचित जमाती महिला. ६ टोळी, जोगलखेडे, पळासखेडे बु, शिरसमणी, सार्वे बु, आडगाव वरील प्रमाणे सहा ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिला राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करीता निश्चित केलेल्या ग्रामपंचायत १० – धुळपिंप्री, भोकरबारी, खोलसर, करमाड खु, सावखेडे होळ, शेवगे बु., नगांव, मोरफळ, रत्नापिंप्री, टिटवी. नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष करीता निश्चित केलेल्या ग्रामपंचायती.. ९ – चहुत्रे, शिरसोदे, खेडीढोक, पिंप्री प्र. उत्राण, भोलाणे, शेळावे खु., मंगरुळ, मोंढाळे प्र.अ, हिरापूर
वरील प्रमाणे पारोळा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले आहे. या कामी पहिल्या सत्रात प्रभारी तहसीलदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण विगतवारी काढण्यात आली होती. दुपारच्या सत्रात एरंडोल उपविभागीय महसूल अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ८४ ग्रामपंचायत मधून महिला आरक्षण काढण्यात आले.