पारोळा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग क्र. ६च्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने व निकृष्ट होत असून अजंग ते तरसोद टप्प्यात नव्या व जुन्या दोन्ही महामार्गांवर रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. महामार्गाच्या कामाला गती मिळावी आणि लवकरात लवकर डागदुगी करावी यासाठी शिवसेनेतर्फे आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारोळा येथे आज रास्ता रोको करण्यात आला.

महामार्गावर अनेक अपघात होवून जिवितहानी होत आहे. खराब रस्त्यावर किंवा काम सुरु असल्याचा बऱ्याच ठिकाणी सूचना फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह लावलेले नाहीत. वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामाला गती मिळावी, खड्ड्यांना तात्काळ डागडूगी करण्यात यावी, निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसह तीव्र निषेध करत आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वात व पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्यात आला.
या मागण्या मार्गी लावण्यात याव्या असे असे लेखी निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अरूण सोनवणे, पंकज प्रसाद, दिग्वीजय पाटील, प्रदीप त्रीवेदी, अनुपकुमार श्रीवास्तव, नंदकुमार जोशी, शशी जोशी यांनी सह्यानिशी दिले.
याप्रसंगी पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील , एरंडोल तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, पारोळा शहरप्रमुख अशोक मराठे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विवेक माळी, एरंडोल शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेना पारोळा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील, एरंडोल तालुकाप्रमुख बबलु पाटील, युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, तहसिलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, नगराध्यक्ष दयाराम पाटील, बाजार समिती उपसभापती दगडु पाटील, संचालक चतुरभाऊ पाटील, मधुकर पाटील व सर्व संचालक मंडळ, शेतकी संघ चेअरमन अरूण पाटील, व्हा.चेअरमन सखाराम चौधरी व सर्व संचालक मंडळ, जि.प.सदस्य दिनकर पाटील, संजय पाटील, उपशहरप्रमुख शुभम शिंपी, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, एरंडोल पंचायत समिती उपसभापती विवेक पाटील, देवगांवचे सरपंच समिर पाटील, दासभाऊ पाटील, सभापती शालिक गायकवाड, सभापती पांडुरंग पाटील, कुणाल पाटील, अमोल भावसार, चेतन पाटील, बापु मराठे, राजु पाटील, सुजित पाटील, सुशिल पाटील, राजेंद्र ठाकुर, निंबा चौधरी, दिनेश पाटील, राज पाटील, छोटु चौधरी, .नगरसेवक राजेंद्र कासार, मयुर मराठे, बापु पाटील, भिकन महाजन, भरत पाटील, भैय्या पाटील, चिंतामण पाटील, नंदु पाटील, सयाजी पाटील, सुनिल निकम, अस्लम खाटीक, सिध्दार्थ जावळे, महेंद्र पाटील, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पत्रकार, शिवसैनिक आदी उपस्थित होते.







