पारोळा(प्रतिनिधी)- शुक्रवारी संध्याकाळी तालुक्यातील दगडी सबगव्हान , हिरापूर, उतरड, म्हसवे, लोणी, धुळपिंप्री, जोगल खेडे या गावाच्या परिसरात मुसळधार पाऊस होऊन त्यात ज्वारी, बाजरी, मका या पिकांसह कापसाचे ही नुकसान झाले.
सततच्या पावसा मुळे यंदाच्या खरीप हंगाम हातातून गेला असतांना उरल्या सुरल्या पिकाचे परतीच्या पावसाने शेतपिकाचा अखेरचा घासही हिरावल्याने शेतकऱ्यांचे अश्रू थांबत नसल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या घरात जो काही शेतमाल हाती आला होता त्याला व्यापाऱ्यांकडून किळकोळ भाव मिळत असून यामूळे बळीराजाचे आर्थिक बाजूने कंबरडे मोडले जात आहे.
यंदाच्या खरीप हंगामात अतिपावसामुळे मोजके पीक बळीराजा च्या हातात आले असून दिवसाला ३००रुपये या वाढती मजुरी मुळे शेतकरी त्रस्त दिसत आहे.
सतत पडणारा पाऊस, कपाशीला मिळणारा कमी भाव आणि वाढती मजुरी यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले असून शासनाकडून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.








